Pusegaon News : नेर फाट्यानजीक आयशर ट्रक-कारची समोरासमोर धडक; पुसेगावातील दांपत्याचा जागीच मृत्यू, मुलगा गंभीर जखमी
Pusegaon News : सातारा-पंढरपूर महामार्गावरील नेर फाट्यानजीक (श्रीनिधी पेट्रोल पंपाजवळ) मध्यरात्रीच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक अपघात घडला आहे.

Pusegaon News : सातारा-पंढरपूर महामार्गावरील नेर फाट्यानजीक (श्रीनिधी पेट्रोल पंपाजवळ) मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात पुसेगाव येथील दांपत्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. आयशर ट्रक आणि मारुती कार यांच्यात झालेल्या जोरदार धडकेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Pusegaon News)
या अपघातात विजय बबनराव भोसले (वय सुमारे 50), श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळातील वरिष्ठ लिपिक, तसेच त्यांच्या पत्नी समृद्धी विजय भोसले (वय सुमारे 45) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मुलगा वरद विजय भोसले गंभीर जखमी असून त्याच्यावर सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Pusegaon News)
पुसेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयशर ट्रक (एमएच 25 एजे 9334) साताऱ्याकडे जात असताना कोरेगावच्या दिशेने येणाऱ्या मारुती कार (एमएच 11 डीएन 3580) ची ट्रकला जोरदार धडक झाली. या धडकेत कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. (Pusegaon News)
अपघाताची माहिती मिळताच पुसेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तिघांनाही तातडीने पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विजय भोसले आणि समृद्धी भोसले यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. गंभीर जखमी वरद भोसले याला पुढील उपचारासाठी सातारा येथे हलविण्यात आले. (Pusegaon News)
या प्रकरणी आयशर ट्रक चालक समीर बाबू नदाफ (रा. तुगाव, ता. उमरगा, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुसेगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 106(1), 281, 125(A), 125(B), 324(4) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (Pusegaon News)
या प्रकरणाचा तपास पुसेगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पुढील तपास हवालदार कोळेकर करीत आहेत. दरम्यान, श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाचे वरिष्ठ लिपिक विजय भोसले आणि त्यांच्या पत्नी यांच्या आकस्मिक निधनामुळे पुसेगाव परिसरात शोककळा पसरली असून सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Pusegaon News)




