Pusegaon Forest Department: पुसेगाव वनविभागाचा शिकाऱ्यांना थेट इशारा! गुन्हा केल्यास होणार ७ वर्षांची जेल, पाहा नवीन नियम
Pusegaon Forest Department: पुसेगाव परिसरात वनविभागाची विशेष रात्रगस्त सुरू; मानवी हस्तक्षेप व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रशासनाचा कडक पाऊल उचलण्याचा इशारा.

Pusegaon Forest Department – वन परिमंडळातील पुसेगाव, विसापूर, डिस्कळ या क्षेत्रातील सर्व गावात वनविभागाच्या हद्दीत आणि इतरत्र ठिकाणीही वनविभागाच्यावतीने शिकार मुक्त अभियान राबवले जात आहे. त्यामुळे कुणीही असे कृत्य करू नये, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा वनपाल राजाराम काशीद यांनी दिला आहे. पुसेगाव वन परिमंडळ परिसरात शिकार करणे, जंगल क्षेत्रात वनसंपदेचे नुकसान करणे, वन क्षेत्रात विना परवाना अतिक्रमण करणे,
मानव व वन्यजीव संघर्ष अशा बाबी निदर्शनास आल्यास तात्काळ संबंधित वनरक्षक, वनपाल यांना माहिती द्यावी, माहिती देणार्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल. तसेच त्यास योग्य बक्षीस दिले जाईल असेही काशीद यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अवैध वृक्षतोड करताना कोणी निदर्शनास आल्यास तत्काळ संपर्क साधावा असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
वनांचे संरक्षण करणे सर्वांचे कर्तव्य असून शासनामार्फत पीक नुकसान, पशुधन हानी, मनुष्यहानी यामध्ये नुकसान भरपाई दिली जाते. जंगलापासून आवश्यक प्राणवायू, पर्जन्यमान, मृदू संधारण अशा महत्वाच्या गोष्टी मिळतात. पुढील पिढीसाठी प्रत्येकाने एक झाड लावणे आवश्यक असल्याचे काशीद यांनी नमूद केले.
गोपनीय खबर्यांचे जाळे तयार
पुसेगाव परिमंडळमध्ये कोणत्याही वन्य प्राण्यांची शिकार होऊ नये म्हणून गोपनीय खबर्यांचे जाळे तयार करण्यात आले आहे. वनविभागाच्यावतीने रात्रगस्त सुरु आहे. अवैध शिकार करणार्यास व सहभागी आरोपींना 3 ते 7 वर्षे तुरुंगाची शिक्षा, 25 हजार ते 1 लाखापर्यत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
राजाराम काशीद, वनपाल पुसेगाव.





