Pusegaon News : डिस्कळ जवळ भीषण अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत ४० वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू; चालक फरार
Pusegaon News : पुसेगाव ते फलटण रस्त्यावरील डिस्कळ (ता. खटाव) गावच्या हद्दीत एका अज्ञात भरधाव वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे.

Pusegaon News : पुसेगाव ते फलटण रस्त्यावरील डिस्कळ (ता. खटाव) गावच्या हद्दीत एका अज्ञात भरधाव वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. (Pusegaon News)
महेंद्र जालींदर माने (वय ४०, रा. डिस्कळ, ता. खटाव, जि. सातारा) असे या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pusegaon News)
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ०५ जून रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मृत महेंद्र माने हे आपल्या मोटरसायकलवरून (क्रमांक MH 11 BM 6476) पुसेगाव-फलटण रस्त्याने डिस्कळच्या दिशेने येत होते. मौजे डिस्कळ गावच्या हद्दीतील गावओढ्याजवळ आले असता मागून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने महेंद्र यांच्या मोटरसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. (Pusegaon News)
ही धडक इतकी भीषण होती की, महेंद्र माने यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या मोटरसायकलचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. (Pusegaon News)
या संदर्भात मृत महेंद्र यांचे चुलते अविनाश सिताराम माने (वय ७३ वर्षे, व्यवसाय-शेती, रा. डिस्कळ) यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पुसेगाव पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pusegaon News)
पुसेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. एन. जे. खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार पोलीस उपनिरीक्षक शेख हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. (Pusegaon News)





