Sherpa guide : ‘हा चमत्कारच!’ एव्हरेस्टवर मृत्यूला हरवून परतला; कुटुंबीय करत होते अंत्यविधीची तयारी
Sherpa guide : या काळात दावा शेर्पा यांनी मार्गात सोडून दिलेल्या तंबूंमधील अन्नपदार्थ, पाणी आणि उपलब्ध ऑक्सिजन सिलिंडरच्या मदतीने स्वतःचा जीव वाचवला.

Sherpa guide : जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवर एक अविश्वसनीय आणि थरारक घटना घडली आहे. एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान बेपत्ता झालेल्या 52 वर्षीय अनुभवी शेर्पा मार्गदर्शक दावा शेर्पा यांचा मृत्यू झाल्याचे मानले जात होते. त्यांच्या कुटुंबीयांनी अंत्यविधीची तयारीही सुरू केली होती. मात्र, बेपत्ता झाल्यानंतर तब्बल सहा दिवसांनी ते बेस कॅम्पजवळ जिवंत आढळून आले, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा एक प्रकारचा चमत्कार असल्याचे बोलले जात आहे. (Sherpa guide)
दावा शेर्पा यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जवळपास 12 किलोमीटरचा जीवघेणा प्रवास केला. अन्न, पाणी आणि पुरेशा ऑक्सिजनशिवाय त्यांनी सुमारे 25 हजार फूट उंचीवरील ‘यलो बँड’ पार करत 17 हजार फूट उंचीवरील ‘क्रॅम्पॉन पॉईंट’ गाठला. या काळात त्यांनी एव्हरेस्टवरील अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या ‘खुंबू आइसफॉल’चा प्रवासही पूर्ण केला. (Sherpa guide)
मिळालेल्या माहितीनुसार, दावा शेर्पा हे 28 मे रोजी ब्रिटिश गिर्यारोहक ख्रिस थ्रॉल आणि एका पोलिश गिर्यारोहकासोबत एव्हरेस्ट मोहिमेवरून परतत होते. 29 मे रोजी त्यांना शेवटचे ‘यलो बँड’ परिसरात पाहण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा संपर्क तुटला आणि ते बेपत्ता झाले. (Sherpa guide)
या काळात दावा शेर्पा यांनी मार्गात सोडून दिलेल्या तंबूंमधील अन्नपदार्थ, पाणी आणि उपलब्ध ऑक्सिजन सिलिंडरच्या मदतीने स्वतःचा जीव वाचवला. दुसरीकडे, त्यांचा मृत्यू झाल्याचे गृहित धरून कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली होती आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली जात होती. (Sherpa guide)
दरम्यान, कॅम्प-1 जवळ ते सुमारे 60 फूट खोल बर्फाच्या भेगेत पडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, नशिबाने त्यांची साथ दिली. जोरदार हिमवृष्टी आणि छोट्या हिमस्खलनामुळे ती भेग बर्फाने भरली गेली, ज्यामुळे त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला. अखेर बुधवारी रात्री त्यांनी स्वतःला त्या संकटातून बाहेर काढत सुरक्षित ठिकाण गाठले.
In what authorities are calling an “astonishing” testament of human survival, a Mount Everest sherpa was found alive on Thursday after he went missing six days ago on the world’s tallest mountain.
The sherpa, identified as 52-year-old Hillary Dawa Sherpa, was discovered by a… pic.twitter.com/Kyg9mCEEqK
— ABC7 News (@abc7newsbayarea) June 4, 2026
दावा शेर्पा यांच्या या थरारक बचावकथेची जगभरात चर्चा होत असून अनेक गिर्यारोहक आणि तज्ज्ञ याला “एव्हरेस्टवरील चमत्कार” असे संबोधत आहेत. त्यांच्या जिद्दीने, धैर्याने आणि जगण्याच्या इच्छाशक्तीने संपूर्ण गिर्यारोहण विश्वाला प्रेरणा दिली आहे. काठमांडूच्या रुग्णालयातून त्यांची मुलगी, मेंडो ल्हामू शेर्पा, भावूक होऊन म्हणाली, “त्याने मला ओळखले आहे आणि तो बोलत आहे. आमचे कुटुंब खूप आनंदित आहे.” (Sherpa guide)
हेही वाचा : Pune News : गॅस गळती होऊन सिलेंडरचा स्फोट; एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी





