Influencer Mansi Death : प्रसिद्ध इन्फ्लूएन्सर मानसीचा संशयास्पद मृत्यू; धक्कादायक माहिती समोर
सोशल मीडिया विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स असलेल्या २३ वर्षीय प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मानसीने (Influencer Mansi Death) सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे.

Influencer Mansi Death : सोशल मीडिया विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स असलेल्या २३ वर्षीय प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मानसीने (Influencer Mansi Death) सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे.
पती आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप मानसीच्या कुटुंबाने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत मानसीचा पती सागर राजपूत याला अटक केली आहे.
लग्नानंतर दीड वर्षातच सुखाचा संसार मोडला
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील सहादतगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मानसीचा विवाह (Influencer Mansi Death) दीड वर्षांपूर्वी सागर राजपूत याच्याशी झाला होता. सागर हा महानगरपालिकेत कंत्राटी तत्त्वावर कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करतो, तसेच तो स्वतःही एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून इन्स्टाग्रामवर त्याचे ७.९३ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
शनिवारी रात्री मानसीचा मृतदेह राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. शवविच्छेदन (पोस्टमार्टम) अहवालात मानसीने आत्महत्या केल्याची पुष्टी झाली आहे.
एसयूव्ही (SUV) कार आणि प्लॉटसाठी मारहाण
मानसीच्या माहेरच्या लोकांनी सासरच्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. लग्नात आपल्या क्षमतेनुसार रोख रक्कम, मानपान आणि घरातील सर्व साहित्य दिले होते, तरीही सासरची मंडळी समाधानी नव्हती. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच पती सागर आणि सासरच्या इतर मंडळींनी हुंड्यात महागडी ‘एसयूव्ही’ (SUV) कार आणि एका प्लॉटची मागणी करण्यास सुरुवात केली. ही मागणी पूर्ण करण्यास असमर्थता दर्शविल्याने मानसीचा छळ सुरू झाला.
तिला सतत मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता, तसेच मारहाणही केली जात होती. मानसीने अनेकदा फोनवरून स्वतःवर होणाऱ्या या अन्यायाची माहिती आपल्या कुटुंबाला दिली होती. यावर मार्ग काढण्यासाठी आणि तडजोड करण्यासाठी मानसीचे कुटुंबीय अनेकदा लखनौला आले होते, मात्र सागरच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही.
पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय
हुंड्याच्या मागणीसोबतच पती सागर राजपूत याचे दुसऱ्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याची बाबही तपासात समोर येत आहे. या विवाहबाह्य संबंधांमुळे देखील त्यांच्यात सातत्याने वाद होत होते आणि मानसीला त्रास दिला जात होता, असाही आरोप केला जात आहे.
पतीसह ६ जणांवर गुन्हा दाखल; पोलीस तपास सुरू
मानसीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून सहादतगंज पोलिसांनी पती सागर राजपूत, सासरे आणि दोन नणंदांसह एकूण ६ जणांविरुद्ध हुंडाबळीचा (Dowry Death) एफआयआर (FIR) दाखल केला आहे. मानसीच्या कुटुंबाचा असाही संशय आहे की, सासरच्या लोकांनीच तिची हत्या करून मृतदेह लटकवला असावा.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी पती सागर राजपूत (Influencer Mansi Death) याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. या खळबळजनक प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस करत आहेत.






