पुणे जिल्हा: सात वर्षीय तीर्थाकडून हिमालयातील ब्रम्हताल सर

शिक्रापूर – केंदूर (ता. शिरुर) येथील सात वर्षीय चिमुरडी तीर्था साकोरे हिने अनेक किल्ले सर करत नुकताच हिमालयातील ब्रम्हताल सर केला आहे. तीर्थाच्या धाडसी कामगिरीबद्दल सरदार रघुनाथराव ढवळे विद्यालयाकडून तीर्था साकोरेचा सन्मान करण्यात आला आहे.
कताच तीर्थाच्या धाडसी कामगिरीबद्दल सरदार रघुनाथराव ढवळे विद्यालयाकडून तीर्था साकोरेचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्राचार्य अनिल साकोरे, रामशेठ साकोरे, पांडुरंग ताथवडे, पोलीस पाटील सतीश गावडे, भाऊसाहेब थिटे, श्रीहरी पऱ्हाड, विद्या थिटे, शिवाजी डेरे, विठ्ठलराव रहाणे, पुनाजी थिटे, विष्णू साकोरे, गोपीनाथ ताठे, पाटीलबुवा साकोरे, दत्तात्रय साकोरे, सुरेश गावडे, शिवराम भोसुरे, तुकाराम साकोरे, कोंडीभाऊ पवार, प्रशांत पऱ्हाड, सुदाम थिटे उपस्थित होते. दरम्यान, यावेळी बोलताना तीर्था साकोरेच्या कामगिरीची युवकांनी प्रेरणा घ्यावी असे मत प्राचार्य अनिल साकोरे यांनी सांगितले.
जागतिक पातळीवर दखल
केंदूर येथील विष्णू निवृत्ती साकोरे यांची नात असलेल्या तीर्था ही दुसरीमध्ये शिक्षण घेत आहे. तिने महाराष्ट्रातील अनेक किल्ले सर केले. नुकतेच हिमालयातील ३७२८ मीटर व १२२५० फूट उंचीवरील ब्रम्हताल हा तीन दिवसांत सर केला आहे. या मोहिमेवेळी रात्रीचे तापमान ३ ते ५ अंश होते. तर दिवसाचे तापमान ६ ते ८ अंश होते. तिर्थाला इंटरनँशनल बुक ऑफ रेकॉर्ड २०२३ पुरस्काराने सन्मानित केले आहे. तिने यापूर्वी महाराष्ट्रातील सिंहगड तीन वेळा, तर शिवनेरी, मल्हारगड व पुरंदर दोनवेळा आणि तिकोना एकवेळा सर केला आहे.





