Pune News : गॅस गळती होऊन सिलेंडरचा स्फोट; एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी
जवानांनी तातडीने स्फोटात होरपळलेल्या चौघांना सदनिकेतून बाहेर काढून त्यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला.

पुणे : सदनिकेत घरगुती वापराच्या सिलिंडरमधून गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाल्याची घटना खराडीतील भागातील एका सोसायटीत शुक्रवारी सकाळी घडली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन जण जखमी झाले. Pune News
खराडीतील खांदवेनगर भागात फाॅर्च्युन सिटी सोसायटी आहे. शुक्रवारी सकाळी या सोसायटीतील एका सदनिकेत सिलिंडरमधून गळती झाली. त्यानंतर सिलिंडरचा स्फाेट झाला.
सिलिंडरय्या स्फोटात चौघे जखमी झाले. या घटनेची माहिती रहिवाशांनी अग्निशमन दलाला दिली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
जवानांनी तातडीने स्फोटात होरपळलेल्या चौघांना सदनिकेतून बाहेर काढून त्यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. (Pune News )






