माळेगाव – गुढी पाडव्याच्या अनुषंगाने शिवनगर माळेगाव बुद्रुक येथे गस्त घालत असताना तलवारी, कोयता घेऊन थांबलेल्या एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन कोयते व तलवार जप्त करण्यात आली.
तेजस खंडाळे (रा. लकडेनगर माळेगाव, ता. बारामती) हा झेलसिंग रोड माळेगाव येथे 3 ते 4 तलवारी व कोयते घेऊन थांबला आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांना खबऱ्याकडून मिळाली. आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे 2 कोयते व 1 तलवार आढळून आली आहे. आरोपीस ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गर्द्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, पोलीस नाईक राजेंद्र काळे, दत्तात्रय चांदणे, पोलीस शिपाई संतोष मखरे, होमगार्ड सकट, भंडलकर किशोर, धनगर यांनी केली आहे. अधिक तपास माळेगाव पोलीस करीत आहेत.