दहिवडी (प्रतिनिधी) – बँकॉक,थायलंड येथे किंग गोल्ड कप कप चॅम्पियनशिप भारतीय टेनिस बॉल क्रिकेट संघामध्ये ऋषभ विरभद्र कावडे याची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या वतीने नागपूर येथे महाराष्ट्र संघाची निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. या निवड चाचणीमध्ये ऋषभ यांची महाराष्ट्र संघामध्ये निवड करण्यात आली होती.
राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तामिळनाडू येथे आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्याची भारतीय संघामध्ये निवड करण्यात आली आहे. शिखर शिंगणापूर सारख्या ग्रामीण भागात राहून टेनिस बॉल क्रिकेट खेळामध्ये उत्कृष्ट सराव करून ऋषभने भारतीय संघामध्ये स्थान निर्माण केले.
भारतीय संघामध्ये निवड झाल्याबद्दल पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे व दहिवडी पोलीस ठाण्याचे सपोनि. अक्षय सोनवणे साहेब यांनी निवड झाल्याबद्दल ऋषभ कावडे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या ऋषभ याची भारतीय संघामध्ये निवड झाल्याबद्दल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सचिव मॉन्टी लॉरी, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर,
महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सचिव मंहमंद बाबर, उद्योजक अतुल शिंदे ,माजी सभापती अतुल जाधव, माजी उपसरपंच शंकर तांबवे, उपसरपंच राजू पिसे, शिखर शिंगणापूरचे माजी खेळाडू व मार्गदर्शक रमेश भागवत, डी. के. बडवे या मान्यवरांनी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले..