Siddharth Chandekar| मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने चित्रपटांसह वेबसिरीजमध्ये देखील काम केले आहे. याशिवाय तो सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकदा त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येते. मात्र तो ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देतो. नुकताच त्याने सोशल सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे.
सिद्धार्थने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो लाफ्टर इमोजीबद्दल बोलताना दिसत आहे. सिद्धार्थनं या मजेशीर व्हिडीओला कॅप्शन दिलं, “सगळ्यांचं होतं का माहीत नाही, मला तर लय राग येतो!” या इमोजीबद्दल सिद्धार्थ म्हणतो, “तुम्हाला कधी कुठल्या हसणाऱ्या स्माइलीला थोबाडीत मारावीशी वाटलीये का? म्हणजे बघाना, आपल्याला कोणीतरी एक कमाल रील पाठवतं. आपल्या खूप हसू येतं मग आपण उत्साहात बरेच स्माइलीचे इमोजी सेंड करतो. पण यावेळी एक स्माइली खालच्या रांगेत जातो. आता तुला काय झालं होतं वर त्यांच्याबरोबर राहायला? तुला अक्कल नाहीये? देऊ का एक थोबाडीत?”
View this post on Instagram
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी सिद्धार्थ चांदेकर आणि सई ताम्हणकरचा श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट रिलीज झाला होता. याशिवाय तो ऑनलाइन बिनलाइन, झिम्मा, झिम्मा 2, ओले आले या चित्रपटांमध्ये देखील सिद्धार्थनं काम केलं आहे.