नगर, (प्रतिनिधी) – आदर्शगाव हिवरेबाजार येथील चाणकाईमाता मंदिराजवळील डोंगराला २० मार्च रोजी रात्री १० वाजता आग लागली. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरे बाजारमध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यन्वित असल्याने काही मिनिटातच मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ व तरुण मंडळ तसेच ग्रामवन समितीचे सदस्य यांच्या अथक प्रयत्नातून आग आटोक्यात आली आणि मोठा अनर्थ टळला.
रात्री आग लागण्याची ही दुसरी वेळ असून, यापूर्वी ७ मार्च रोजी सुध्दा रात्रीच आग लागली होती.आगीत मोर ,हरणे, ससे, लांडगे व इतर वन्यजीव आपला जीव वाचविण्यासाठी धावत होते.