संगमनेर, (प्रतिनिधी) – राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या संजय गांधी निराधार योजना अंतर्गत तालुक्यातील लाभार्थ्यांना जानेवारी व फेब्रुवारीअखेर ३ कोटी १५ लाख ८ हजार १०० रुपये लाभार्थी खात्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी दिली.
जानेवारी व फेब्रुवारीचे संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण ५, २४८ लाभार्थ्याना १ कोटी ५५ लाख ७३ हजार रुपये, फेब्रुवारीचे संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जाती ५६० लाभार्थ्याना ८ लाख ३२ हजार ५०० रुपये,चसंजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जमाती २२८ लाभार्थ्यांना ३ लाख ३९ हजार रुपये ,श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना सर्वसाधारण ५३४६ लाभार्थ्यांना ८० लाख १९ हजार रुपये,
श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जाती ७०१ लाभार्थ्यांना १० लाख ५१ हजार ५०० रुपये, श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जमाती ३२५ लाभार्थ्यांना ४ लाख ८७ हजार ५०० रुपये व श्रावणबाळ गट अ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ४०५३ लाभार्थ्यांना ५२ लाख ३५ हजार ६०० रुपये अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खातेवर वर्ग करण्यात आले आहे. लाभार्थी म्हणून मानधन मिळण्यास काही अडचण येत असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन अमोल खताळ पाटील यांनी केले आहे.