Ananya Pandey : बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेने अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली आहे. अनेकदा तिला तिच्या फॅशन करण्याच्या पद्धतीमुळे ट्रोल केले जाते. नुकतेच पॅरिसमध्ये पार पडलेल्या फॅशन शोमध्ये अनन्याने सहभाग घेतला होता. येथील तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावेळी अनन्याने केलेल्या फॅशनमुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.
सध्या सुरू असलेल्या पॅरिस फॅशन वीकमध्ये अभिनेत्री अनन्या पांडेने रॅम्प वॉक केला. पॅरिस हाउट कॉउचर वीक 2024 मध्ये ही अभिनेत्री डिझायनर राहुल मिश्रासाठी शोस्टॉपर बनली. रॅम्पवर चालणारी ती सर्वात तरुण बॉलिवूड अभिनेत्री ठरली. यावेळी अनन्याने ब्लॅक बटरफ्लायसारखा मिनी ड्रेस घातला होता. यावेळी तिने हातात गोल आकाराचे मोठे जाळे धरले होते.
View this post on Instagram
तिच्या या फॅशननंतर अनेकांनी तिची तुलना उर्फी जावेदसोबत केली आहे. ‘फॅशन इनस्पायर्ड बाय उर्फी,’ ‘ही नवीन उर्फी आहे का?’ अशी कमेंट काही नेटकऱ्यांनी केली आहे. तर एका नेटकऱ्याने तुझ्यापेक्षा तर उर्फी बरी, ती चांगले कपडे परिधान करते. ही तू मच्छरदानी घालून कुठं चालली, असा प्रश्न नेटकऱ्यांनी तिला विचारला आहे. यापूर्वी देखील अनन्यावर नेटकऱ्यांनी टीका केल्याचे दिसून आले आहे.
अनन्या पांडेच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाले तर, गेल्या वर्षी आयुषमान खुराणासोबत ड्रीम गर्ल 2 मध्ये दिसून आली होती. त्यानंतर ती ‘खो गये हम कहा’ मध्ये दिसून आली होती. नेटफ्लिक्सवर आलेल्या या चित्रपटाने चाहत्यांची पसंती मिळवली होती.