कोलंबिया – अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांंची मनस्थिती अमेरिकेचे अध्यक्ष बनण्यासाठी अयोग्य आहे, असा आरोप रिपब्लिकन पक्षाच्या इच्छुक नेत्या निकी हेले यांनी केला आहे. ट्रम्प हे प्रचाराच्या भाषणांमध्ये आपल्याला वारंवार अमेरिकेच्या संसदेच्या माजी सभापती नॅन्सी पेलोसी समजून संबोधन करत असल्याचा संदर्भ देऊन त्यांनी हा आरोप केला.
न्यू हॅम्पशायरमधील किने येथे प्रताराच्या भाषणामध्ये त्या बोलत होत्या. आदल्या दिवशी ट्रम्प यांनी केलेल्या भाषणाचा संदर्भ हेले यांनी दिला. दिनांक ६ जानेवारी २०२१ रोजी ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपिटल हिलमध्ये घुसून धुडगूस घातला गेला, त्यावेळी हेले या कॅपिटल हिलच्या सुरक्षा प्रमुख होत्या, असे ट्रम्प म्हणाले होते. आप्लया प्रशासनाने पुरवलेली सुरक्षा हेले यांनी नाकारली होती.
हेले यांच्याकडेच सुरक्षा व्यवस्था असल्यामुळे त्यांनीच या हल्ल्याबाबतचे सर्व पुरावे, माहिती आणि सर्व संदर्भही नष्ट केले, असेही ट्रम्प म्हणाले होते. मात्र त्यांना हे आरोप नॅन्सी पेलोसी यांना उद्देशून करायचे होते, हे ते विसरून गेले होते. म्हणूनच त्यांची मनस्थिती अध्यक्षपदासाठी योग्य नाही, असे निकी हेले म्हणाल्या.
मात्र निकी हेले किंवा नॅन्सी पेलोसी कोणाबद्दलही ट्रम्प बोलले असले तरी काय फरक पडतो, अशी सावरासावर ट्रम्प यांच्या प्रचार प्रमुखांनी केली. ट्म्प यांनी अध्यक्ष असताना संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूतपदासाठी निकी हेले यांचीच निवड केली होती. मात्र अध्यक्षपदासाठी निकी हेले या उमेदवारीच्या रिंगणात उतरल्यावर ट्रम्प हेले यांच्यावर वैयक्तिक टीका करायला लागले आहेत.