पुणे – भ्रष्टाचार, कमिशनखोरी, लुबाडणूक आणि लाचखोरी हाच काँग्रेसचा इतिहास आहे. त्याचा आणखी एक भ्रष्ट चेहरा झारखंडमध्ये उजेडात आला आहे. काळा पैसा आणि भ्रष्टाचार काँग्रेसी भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक असल्याची टीका भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांनी शनिवारी पुण्यात केली.
या राज्यात काँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज साहू यांच्या घरात सुमारे नऊ कपाटांमध्ये खचाखच भरलेली तीनशे कोटींहून अधिक रकमेची रोकड जप्त करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर भांडारी बोलत होते. भांडारी म्हणाले, भ्रष्टाचार रोखण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या मोहिमेतून देशभरात अशी प्रकरणे उघडकीस येत आहेत. भ्रष्टाचाराचे भांडे फुटू लागल्यामुळेच सारे भ्रष्ट नेते इंडिया आघाडीच्या नावाने एकत्र आले आहे. आता एकएक प्रकरण बाहेर पडू लागल्यामुळे आता ईडी, सीबीआय, आयकर यांसारख्या संस्थांच्या नावाने सामूहिक रडगाणे सुरू झाले आहे अशीही टीका यावेळी त्यांनी इंडिया आघाडीच्या एकत्रीकरणावर केली.