मुंबई – ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक (Dutta dalavi arrest) करण्यात आली आहे. एका सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना शिवीगाळ केल्याने दत्ता दळवी आज सकाळी अटक करण्यात आली.यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने आले आहेत.दळवी यांच्या अटकेनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी राऊत यांनी ‘गद्दार हृदयसम्राट’ असा मुख्यमंत्री शिंदे यांचा उल्लेख करत दळवी यांचं काय चुकलं ? असा सवाल देखील उपस्थित केला.
दळवी यांना अटक झाल्यानंतर भांडूप पोलिस स्टेशनबाहेर (Bhandup police Stetion) ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले होते. कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी खासदार संजय राऊत आणि आमदार सुनिल राऊत पोलिस स्टेशनमध्ये देखील पोहचले. यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत घडलेल्या प्रकारावर भाष्य केलं. (Shinde group thackeray group)
यावेळी संजय राऊत म्हणाले,”मुंबईचे माजी महापौर, शिवसेनेचे उपनेते आणि आमचे सहकारी दत्ता दळवी यांना आज सकाळी पोलिसांनी घरात घुसून अटक केली. एखाद्या ३०२, ३०७ कलम लागलेल्या खूनाच्या किंवा खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करायला गेल्यासारखी पोलिसांनी अटक केली. यावेळी पोलिसांचा फौजफाटा दत्ता दळवींच्या घरात घुसला.” (Sanjay raut on Dutta dalavi)
“दत्ता दळवींचा गुन्हा काय आहे? त्यांनी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या लोकभावना भांडूपमधील एका मेळाव्यात व्यक्त केल्या. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी किंवा त्यांच्याबरोबरचे गद्दार हृदयसम्राट स्वतःला हिंदू हृदयसम्राट म्हणवून घेत आहेत. त्यावर तमाम हिंदूंचा आक्षेप आहे,त्यांनी स्वतःला हिंदू हृदयसम्राट म्हणवून घेणं हा सावरकरांसह बाळासाहेब ठाकरेंचा देखील अपमान आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे,मी मुख्यमंत्र्यांवर नाही ते एकनाथ शिंदेंवर म्हणतोय” असं परखड मत यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केलं.