Tejaswini Pandit: अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) नाटक, सिनेमांमध्ये काम केले आहे. मराठी सिनेसृष्टीतील आघाडींच्या अभिनेत्रींमध्ये तेजस्विनीचे देखील नाव घेतले जाते. तेजस्विनीची आईदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. या दोघींनी चित्रपटामध्ये देखील एकत्र काम केले आहे. यानंतर तेजस्विनीने वडिलांसाठी एक भावुक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
तेजस्विनीच्या वडीलांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या आठवणीत तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर भावुक पोस्ट शेअर केली आहे. तेजस्विनीने इन्स्टा स्टोरीमध्ये तिच्या वडिलांचे काही फोटो शेअर केले आहेत. “तुम्ही सांगितल्याप्रमाणे राजासारखं आयुष्य जगत आहे. बाबा, आठवण येते असं म्हणणार नाही, कारण आठवण यायला आधी विसरावं लागतं आणि ते अशक्यच,” असं तेजस्विनीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अनेक मराठी चित्रपटांत काम केलेली तेजस्विनी हिंदी सिनेमातही झळकली. ओम राऊतच्या ‘आदिपुरुष’ सिनेमात तिने शृपणखाची भूमिका साकारली होती. अभिनयाबरोबरच तिने निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे.
दरम्यान, मध्यंतरी तेजस्वीनीने टोल नाक्यासंदर्भात राज्य सरकारवर निशाणा साधत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. तेजस्विनी पंडितच्या या पोस्टनंतर तिचे ट्विटर अकाउंटवरची व्हेरिफाईड असलेली ‘ब्लू’ टिक हटवले होते. आता याच मुद्द्यावरुन तिने आणखी एक ट्विट शेअर करत कडक शब्दांत ताशेरे ओढले होते.