Anupam Kher : अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम करत बॉलीवूडमध्ये स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात अनुपम खेर यांनी साकारलल्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. सध्या ते ‘विजय 69’ या चित्रपटामुळे चर्चेत आले आहे. नुकतेच त्यांनी ‘विजय 69’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. यानिमित्त अनुपम खेर यांनी टीमसोबत चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याचा आनंद साजरा केला, ज्याची एक झलक त्यांनी चाहत्यांना दाखवली आहे.
अनुपम खेर यांनी दिग्दर्शक अक्षय रॉयच्या आगामी ‘विजय 69’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. हा आनंद त्यांनी केक कापून साजरा केला. ज्याचा एक व्हिडिओ त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ते शूटिंग संपल्यानंतर संपूर्ण टीमसोबत सेटवर आनंद साजरा करताना दिसत आहे.
अनुपम खेर व्हिडिओमध्ये म्हणतात, “प्रत्येकजण विलक्षण होता आणि याचा मी एक भाग असलेला सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. जर तुम्ही मला माझ्या 540 चित्रपटांपैकी माझ्या दहा सर्वोत्तम चित्रपटांबद्दल विचाराल, तर हा नक्कीच त्यापैकी एक असेल.” अनुपम खेर यांनी त्यांचे सहकलाकार, क्रू आणि चित्रपटाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार मानले.
View this post on Instagram
अनुपम खेर यांनी व्हिडिओ कॅप्शनमध्ये एक लांबलचक पोस्ट देखील लिहिली आहे. “हा विजय 69′ चित्रपटाचा अविश्वसनीय, आनंददायक आणि समाधानकारक प्रवास आहे. ‘कधीही हार मानू नका’ या माझ्या स्वतःच्या तत्त्वज्ञानाला बळ देणारा हा चित्रपट आहे. शूटिंग संपल्याची भावना माझ्या मनात आहे, पण या सुंदर चित्रपटाचा माझा प्रवास तुम्हा सर्वांसोबत शेअर करण्यास मी अत्यंत उत्सुक आहे.” यावेळी अनुपम खेर यांनी लेखक आणि दिग्दर्शक अक्षय रॉय यांचेही आभार मानले .
“या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान अनवधानाने कोणाचे मन दुखावले असेल तर क्षमस्व. माझा मित्र चंकी पांडे या माणसाचा आणि त्याने इथे दिलेल्या कामगिरीबद्दल विशेष आभार,” असेही त्यांनी शेवटी पोस्टमध्ये लिहिले आहे.