GST Collection: ऑक्टोबरमध्ये वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन 1.72 लाख कोटी रुपये झाले आहे. हे आतापर्यंतचे दुसरे सर्वोच्च संकलन आहे. याआधी एप्रिल 2023 मध्ये वस्तू आणि सेवा कर (GST) मधून सर्वाधिक महसूल 1.87 लाख कोटी रुपये नोंदवला गेला होता.
दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्टोबर 2022 मध्ये 1.52 लाख कोटी रुपये जीएसटी संकलन झाले होते. या तुलनेत यावर्षी 13 टक्के अधिक संकलन झाले आहे, अर्थ मंत्रालयाने बुधवारी ही माहिती दिली.
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सरासरी सकल मासिक जीएसटी संकलन आता 1.66 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील वर्षाच्या कालावधीपेक्षा 11 टक्क्यांनी जास्त आहे.