Jhimma 2 Movie – “खेळू झिम्मा गं…झिम्मा..गं..’ हे गाणे तुम्हा सर्वांना आठवत असेलच वेगवेगळ्या वयोगटातील मैत्रिणींच्या प्रवासातील मजामस्तीवर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. वैशाली सामंत, मुग्धा कऱ्हाडे, आरती केळकर, सुहास जोशी यांनी हे गाणे गायले होत.
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ (Jhimma Movie) चित्रपट 19 नोव्हेंबर 2021 ला सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. लॉकडाऊननंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे. वेगवेगळ्या वयाच्या आणि वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या स्त्रिया काही काळ जबाबदाऱ्या बाजूला ठेवत मनमुराद जगण्यासाठी इंग्लंडला जातात आणि मग काय धम्माल होते हे सर्व या सिनेमात आपल्याला पाहायला मिळालं.
सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका या सिनेमात आहेत. सिनेसृष्टीतील सात वेगळ्या धाटणीच्या अभिनेत्री एकाच चित्रपटात पाहायला मिळणे, ही प्रेक्षकांसाठी खरंच पर्वणी होती.
दरम्यान, जगभरातल्या प्रेक्षकांनी ‘झिम्मा’वर भरभरून प्रेम केल्यानंतर आता लवकरच ‘झिम्मा 2’ (Jhimma 2 Movie) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. अभिनेत्री सायली संजीवने (sayali sanjeev) इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
View this post on Instagram
यात तिने “तुमचे आमचे रियुनियन- झिम्मा 2′ (Jhimma 2) असे म्हटले आहे. ‘पुढच्या ट्रिपची तारीख ठरली… आनंदाची गाडी सुटली! 24 नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात…”, असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे.
हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत निर्मिती संस्था ‘कलर यल्लो प्रोडक्शन’ आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी या चित्रपटाची प्रस्तुती करणार आहेत. चलचित्र मंडळी आणि क्रेझी फ्यु फिल्म्स निर्मित हा चित्रपट येत्या 24 ऑक्टोबरला म्हणजेच दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.