Israel Attack: पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमासने शनिवारी (7 ऑक्टोबर) इस्रायलवर केलेल्या रॉकेट हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही निष्पाप पीडितांसोबत आहोत. त्यांनी याला दहशतवादी हल्ला म्हटले आहे.
पीएम मोदींनी सोशल मीडिया X वर लिहिले की, “इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्याच्या बातमीने खूप धक्का बसला. आमच्या प्रार्थना निष्पाप पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. या कठीण काळात आम्ही इस्रायलच्या पाठीशी उभे आहोत.
Deeply shocked by the news of terrorist attacks in Israel. Our thoughts and prayers are with the innocent victims and their families. We stand in solidarity with Israel at this difficult hour.
— Narendra Modi (@narendramodi) October 7, 2023
बेंजामिन नेतान्याहू काय म्हणाले?
हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी देशातील जनतेला सांगितले की, ‘आम्ही युद्धात आहोत’
इस्रायल काय म्हणाले?
असोसिएट प्रेस (एपी) च्या वृत्तानुसार, इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट म्हणाले की, हमासने आमच्याविरुद्ध युद्ध सुरू केले आहे. यात आमचाच विजय होईल. एपीने दुसऱ्या एका वृत्तात म्हटले आहे की, इस्रायली बचाव सेवा विभागाने सांगितले की, हमासच्या हल्ल्यामुळे आतापर्यंत किमान 22 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
याव्यतिरिक्त, इस्रायली सैन्याने गाझा पट्टीजवळील शहरांतील रहिवाशांना त्यांच्या घरात राहण्याच्या सूचना जारी केल्या आहेत आणि उर्वरित लोकांना बॉम्ब पासून बचावासाठी आश्रयस्थानांजवळ राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ने देखील म्हटले आहे की, हमासला याची किंमत चुकवावी लागेल, आमची पूर्ण तयारी आहे.