मुंबई – अभिनेता आमिर खानने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र त्याचा ‘लाल सिंग चढ्ढा’ हा चित्रपट अपयशी ठरला. यामुळे आमिर खानने अभिनयापासून ब्रेक घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा तो दमदार कमबॅक करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र इतर कलाकरांप्रमाणे आमिरची देखील दाक्षिणात्य चित्रपट पदार्पण करणार असल्याची चर्चाही रंगली आहे.
आमिर लवकरच तामिळ चित्रपटामध्ये काम करणार असल्याचे म्हंटले जात आहे. सोशल मीडियावरील एका फोटोमुळे ही चर्चा सुरू झाली आहे. त्याचे झाले असे की, AGS प्रॉडक्शनच्या ऐश्वर्या कल्पथी यांनी आमिर खानसोबतच एक फोटो पोस्ट केला आहे. ‘आमच्या वेळच्या दिग्गज अभिनेत्याला भेटले यावर विश्वास बसत नाही.’ असे कॅप्शन त्या पोस्टला दिले आहे.
View this post on Instagram
ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या पोस्टमुळे आमिर खान दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करणार असल्याचे बोलले जात आहे. AGS प्रॉडक्शनच्या दोन्ही चित्रपटांमध्ये आमिर खान खलनायकाची भूमिका साकरणार असल्याचे देखील म्हंटले जात आहे. दरम्यान, वेंकट प्रभू दिग्दर्शित विजयचा आगामी चित्रपट ‘दलापति 68’ आणि जयम रवी-स्टारर मोहन राजा दिग्दर्शित ‘थानी ओरुवन 2’या चित्रपटाची निर्मिती AGS प्रॉडक्शन करत आहेत. मात्र या चित्रपटातील कलाकारांशिवाय कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या चित्रपटात आमिरची एंट्री होणार की नाही हे अद्याप अधिकृतरित्या स्पष्ट झालेले नाही.