ऋता दुर्गुळे झळकणार हिंदी वेबसीरिजमध्ये; ‘या’ अभिनेत्यासोबत झळकणार

Hruta Durgule | अभिनेत्री म्हणजे ऋता दुर्गुळे मालिकांसह मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी चित्रपटात देखील तिने विविध भूमिका साकारल्या आहेत. यानंतर आता ऋता हिंदी वेब विश्वात पदार्पण करत आहे. नुकतेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत तिने ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
ऋताने इनस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘Finally, Commander Karan Saxena Reporting For Team India !!’ असं कॅप्शन दिले आहे. ‘कमांडर करण सक्सेना’ या वेब सिरीजमध्ये ऋता काम करणार असल्याचे तिने यातून सांगितले आहे. या वेब सिरीजमध्ये गुरमीत चौधरी मुख्य भूमिकेत आहे. यातील त्याच्या दमदार अॅक्शन सीनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही वेबसीरिज ८ जुलै रोजी हॉटस्टार या ओटीटी चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे. Hruta Durgule |
View this post on Instagram
ऋता या सिनेमात नेमकी कोणत्या भूमिकेत दिसणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र ऋताच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तीच अभिनंदन केलं आणि तिला तिच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. Hruta Durgule |
ऋताने ‘दुर्वा’ या मालिकेतून मराठी सिनेविश्वात पदार्पण केले होते, त्यानंतर ऋता ‘फुलपाखरु’ या मालिकेत दिसली. यानंतर तिने ‘अनन्या’ हा तिचा पहिला सिनेमा होता. त्यानंतर ऋता ‘टाईमपास ३, ‘कन्नी’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली. यानंतर आता ती ओटीटी विश्वात पदार्पण करत आहे.
हेही वाचा:





