देशातील लाखो महिला उद्योजकांनी सर्व आव्हाने पेलत आपल्या यशाची पताका फडकवली आहे. देशापासून परदेशात अनेक भारतीय महिला उद्योजक आणि नोकरदार महिलांची चर्चा आहे आणि या महिला मोठ्या कंपन्यांची कमान आपल्या हाती घेत आहेत. तुम्ही मोठ्या शहरांमध्ये महिलांची प्रगती पाहिली असेल पण आम्ही एका छोट्या शहरात राहणाऱ्या एका महिला उद्योजकाच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी सांगणार आहोत. गोरखपूरच्या संगीता पांडे यांची यशोगाथा खेड्यापाड्यात आणि शहरात राहणाऱ्या करोडो महिलांसाठी प्रेरणादायी आहे.
मर्यादित संसाधने आणि विरोध असूनही, संगीता पांडेन यांनी आपला व्यवसाय वाढवला. त्यांनी 10 वर्षांपूर्वी 1500 रुपयांपासून सुरुवात केली होती आज ती कंपनी 3 कोटी रुपयांची बनली आहे. संगीता यांनी सुरूवातीला 4,000 रुपयांची नोकरी केली. यादरम्यान त्या आपल्या 9 महिन्यांच्या चिमुकलीला घेऊन ऑफिसला जात असत.
कार्यालयातील अनेकांनी संगीता यांनी आपल्या मुलाला सोबत आणण्यावर आक्षेप घेतला. लोकांनी सांगितले की त्यांनी आपल्या मुलाची काळजी घ्यावी, काम करूनये. दुसऱ्या दिवशी संगीता पांडे यांनी नोकरीचा राजीनामा दिला. यानंतर संगीता यांनी कँडी रॅपिंग बॉक्स बनवणारे दुकान पाहिले, नंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला.
मग संगीता पांडे यांनी महिला उद्योजिका होण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी रेंजर सायकल चालवली आणि कच्च्या मालाच्या शोधात फिरू लागल्या. बाजारातील व्यापाऱ्यांशी चर्चा करू लागल्या. सुरूवातीला त्यांनी काही साहित्य खरेदी केले त्यातून त्यांनी 100 बॉक्स तयार केले.
माल विकला नाही, मग दागिने गहाण ठेवले –
मात्र, संगीता यांनी बनवलेल्या बॉक्सची फारशी विक्री झाली नाही, कारण या वस्तू त्यांनी बनवलेल्या बॉक्सपेक्षा कमी किमतीत बाजारात उपलब्ध होत्या. मग संगीता यांना एका व्यावसायिकाने सांगितले की लखनौमध्ये कच्चा माल स्वस्त आहे. यानंतर संगीता पांडे यांनी बाहेरून कच्चा माल आणण्याची योजना आखली, परंतु ते इतके सोपे नव्हते, कारण त्यासाठी त्यांना अधिक पैशांची गरज होती.
यासाठी संगीता यांनी त्यांचा सोन्याचा नेकलेस तीन लाख रुपयांना गहाण ठेवला आणि या पैशातून लखनौहून कच्च्या मालाने भरलेला ट्रक मागवला. मालाची किंमत कमी असल्याने व्यवसायात बरीच सुधारणा होऊन त्यांचा व्यवसाय झपाट्याने वाढू लागला. यानंतर संगीता यांनी 35 लाख आणि 50 लाख असे दोन कर्ज घेऊन कारखाना सुरू केला.
त्यांना यश येत गेले. त्यांनी बनवलेल्या बाॅक्सला चांगली मागणी मिळत होती. त्यांनी आपला व्यवसाय वाढवला आणि आत संगीता पांडे यांच्या या व्यवसायातून 100 हून अधिक महिलांना रोजगार मिळाला आहे. त्याच्या कंपनीच्या ग्राहकांमध्ये पूर्वांचल स्टोअर्स तसेच पिझेरिया, बेकरी आणि कन्फेक्शनर्स यांचा समावेश आहे. जास्तित जास्त महिलांना काम मिळवून देण्याचा प्रयत्न त्या करत आहेत. उद्योग सुरु करण्याचा विचार मनात असलेल्या महिलांसाठी संगीता यांची ही कहानी प्रेरणादायी आहे. मिठाईच्या पॅकेजिंगसाठी फॅन्सी बॉक्स बनवण्याचा त्यांचा हा व्यवसाय खुप मोठा झाला असून त्यातून अनेक महिलांच्या हाताला काम मिळाले आहे.