नगर -मेहेराबादला अवतार मेहेरबाबा 4 मे 1923 रोजी अरणगावला प्रथम आले होते. त्याला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचा प्रारंभ अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे माजी अध्यक्ष श्रीधर केळकर यांच्या हस्ते लिंबाच्या झाडाखाली बाबाची प्रतिमा पूजन करण्यात आला. या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष फलू मिस्तरी, विश्वस्त डॉ. मेहेरनाथ कलचुरी,रमेश जंगले, जाल दस्तूर, नितीन थाडे आदी उपस्थित होते.
शताब्दीनिमित्त बाबा प्रथम ज्या झाडाखाली बसले होते, तेथे आकर्षक सजावट करण्यात आली होती. या वेळी प्रार्थना करण्यात आली. स्वागत, भजने म्हणण्यात आले. येथून समाधीपर्यंत व तेथून परत कार्यक्रमस्थळी पदयात्रा काढली होती. या वेळी केळकर यांनी बाबांसंदर्भात माहिती दिली. दुपारी 4 ते रात्री 8पर्यंत समाधी स्थळी कार्यक्रम झाला. यामध्ये ट्रस्टचे अध्यक्ष फलू मिस्तरी यांचे प्रवचन, भाऊ कलचुरी लिखित भजने, गाणे नगर सेंटर व इतर सेंटरने सादर केले तसेच व्याख्यानेही झाली. शेवटी मेहेराबाद दि बिगनिंग ही फिल्म दाखविण्यात आली.
आज सकाळी 9 ते 12 पर्यंत भजन, लघुनाटिका, माहितीपट, व्याख्याने विविध केंद्रे सादर करतील. सायंकाळी 4 ते रात्री 8पर्यंत दर्यापूर येथील सेंटर कव्वाली, सिद्धार्थ वर्मा ग्रुप गजल,गोपाळकृष्ण व अजित सोनी हे भजने सादर करतील. उत्तर प्रदेशमधील कानपूर येथील हरिराम व पार्टी बॅंड वाजवतील. रात्री शेवटी फिल्म, भजन आरती व प्रार्थना होऊन सांगता होईल.