रांजणगाव गणपती -श्रीक्षेत्र रांजणगाव महागणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने विनायकी चतुर्थी भक्तीमय वातावरणात साजरी केली. पहाटे अभिषेक, गणेश याग करण्यात आला. महापूजा व महानैवेद्य मुख्य विश्वस्त ओमकार नितीन देव यांच्या हस्ते करण्यात आला.
विनायकी चतुर्थीनिमित्त प्रगतशील शेतकरी व बैलगाडा मालक आनंदराव दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्या वतीने मंदिर गाभाऱ्यात 501 शहाळे देवाला अर्पण करून श्री महागणपती चरणी सेवा अर्पण केली. सध्या तीव्र उन्हाच्या झळा बसत असताना महागणपतीला केलेली शहाळ्यांची मनमोहन व आकर्षक सजावट भाविकांना आकर्षित करीत होती,
अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती दत्तात्रय पाचुंदकर पाटील यांनी दिली. यावेळी देवस्थानचे विश्वस्त मंडळ अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर पाटील, मुख्य विश्वस्त ओमकार देव, खजिनदार विजय देव तसेच पुजारी प्रसाद कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी, राजमुद्रा पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाचुंदकर पाटील, ग्रामस्थ, देवस्थान कर्मचारी उपस्थित होते.