मुंबई – बॉलिवूडची सर्वाधिक बोल्ड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान आता वेगळे झाले आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. असे असूनही दोघांना एकत्र ठेवणारा एक धागा आहे, तो म्हणजे त्यांचा मुलगा. अरहान हा अरबाज आणि मलायका यांचा एकुलता एक मुलगा आहे.
अरबाज आणि मलायका बद्दल बोलायचे झाले, तर 1998 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यानंतर लग्नाला 18 वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर मे 2017 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला असून, आता हे दोघेही आपल्या आयुष्यात खूप पुढे निघून गेले आहेत.
मात्र, असे असूनही हे दोघे अनेकदासोबत स्पाॅट होतात. आणि यावरून नेटकरी देखील या दोघांना चांगलंच ट्रोल करत असतात. नुकतंच एका मुलाखतीत अरबाज खानने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. यावेळी तो त्याची पूर्वाश्रमीची पत्नी मलायका अरोरविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.
यावेळी अरबाजला ‘मलायकासोबत चांगलं नातं ठेवल्यामुळे ट्रोलिंग होत असताना मनात काय भावना असते?’ असा प्रश्न विचारला गेला. त्यावर तो म्हणाला, ‘जग काय म्हणतंय याने मला फरक पडत नाही. लोक तर विविध प्रकारे बोलत असतात. मात्र हे लोक माझ्या घरी हे पाहायला नसतात ना की मी काय करतोय?’
असं नाहीये की आम्ही फक्त कॅमेरासमोर चांगले वागतो. आम्ही एकत्र अरहानचा वाढदिवस साजरा करतो. मी माझ्या मुलाचं काम, त्याचं करिअर, गरजा आणि जबाबदाऱ्या यांविषयी मलायकासोबत नेहमी चर्चा करतो. जर माझ्या मुलाचा फोन लागत नसेल किंवा व्यस्त असेल तर मी मलायकालाच कॉल करतो…’ असं देखील तो यावेळी म्हणाला.