मुंबई – जहांगीर अली खान अर्थात ‘जेह’ हा 21 फेब्रुवारीला दोन वर्षांचा झाला. तैमूर प्रमाणेच सैफ करिनाने आपल्या दुसऱ्या मुलाचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरी केला. यावेळी करीना आणि सैफने त्यांच्या घरी एक भव्य पार्टी दिली, ज्यामध्ये अनेक स्टार किड्स देखील सहभागी झाले होते. याचे अनेक फोटोज आणि व्हिडीओज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताहेत.
करीना आणि सैफने जेहचा दुसरा वाढदिवस त्यांच्या कुटुंबियांसोबत साजरा केला. याची एक झलक सोहा आणि सबा अली खानने सोशल मीडियावर शेअर केली आहे. सबा अली खानने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ आणि काही फोटो शेअर केले आहेत.
जेहच्या वाढदिवसानिमित्त करीनाने तिच्या घराचे छत फुग्यांनी सजवले होते. यावेळी करिनाने आपल्या लाडक्या जेहसोबत केक देखील कापला. यावेळी जेहने निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि राखाडी शॉर्ट्स असा पेहराव केला होता.सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होताच छोट्या जेहचे सर्वजण कौतुक करू लागले आहेत.
View this post on Instagram
या पार्टीसाठी करीनाचे बहीण करिश्माने देखील हजेरी लावल्याचे समजते. यावेळी जेहसोबत तैमूरने देखील मस्ती केल्याचे व्हायरल व्हीडीओमध्ये पाहायला मिळत आहे. छोट्या नवाबला सोशल मीडियावरून देखील चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.