इस्लामाबाद – पाकिस्तानात राहणाऱ्या कट्टरवाद्यांचा हिंदूंप्रती असलेला द्वेष पाकिस्तानात बनवलेल्या एका “सेवक- द कन्फेशन’ या वेब सिरीजवरून कळू शकतो. संपूर्ण मालिकेत भारतासाठी किती विष भरले आहे, हे या वेबसिरीजवरुन सहजच लक्षात येते.
पाकिस्तानमध्ये एकीकडे कट्टरतावाद शिगेला पोहोचला आहे, तर दुसरीकडे येथील हिंदूंची अवस्था कोणापासून लपून राहिलेली नाही.
हिंदू आणि शीख यांच्यावरील अत्याचाराच्या बातम्या सतत येत असतात. त्यांच्यासोबत सक्तीच्या धर्मांतराच्या बातम्याही पाहायला मिळतात. याशिवाय हिंदूंविरुद्ध द्वेष पसरवण्याचे काम येथे नेहमीच सुरू असते. दरम्यान, पाकिस्तानमध्ये अशी एक वेब सिरीज बनवण्यात आली आहे, ज्यामध्ये भारताविरोधात विष उकलण्यात आले आहे. या वेब सिरीजचे नाव आहे सेवक-द कन्फेशन.
या वेब सिरीजचा ट्रेलर लॉंच झाला असून, त्यामुळे चांगलाच गदारोळ झाला आहे. पाकिस्तानातील कट्टरतावाद्यांच्या मनात हिंदूंबद्दल किती द्वेष आहे, याचा अंदाज एका वेबसीरिजवरून लावता येतो. तेथील अनेक हिंदू संघटना यावर आक्षेप घेत आहेत. संपूर्ण मालिकेत भारतासाठी किती विष भरले आहे, हे तुम्ही हा ट्रेलर पाहिल्यास समजेल. या वेब सिरीजमध्ये 8 एपिसोड्स आहेत. या मालिकेत हिंदू संत आणि भाजप नेत्यांविरुद्ध द्वेष दाखवण्यात येत आहे.
या वेब फिल्ममध्ये 1984 ची दंगल, गुजरातची गोध्रा दंगल, बाबरी मशीद वाद यांसारख्या भारतात घडलेल्या काही घटना दाखवण्यात आल्या आहेत. याशिवाय दीप सिद्धू, हेमंत करकरे, गौरी लंकेश, जुनैद खान यांच्या आयुष्यातील काही भागही या वेबसिरीजमध्ये दाखवण्यात आला आहे. या संपूर्ण मालिकेत तुम्हाला फक्त हिंदू संत आणि भाजप नेत्यांविरुद्ध द्वेष पाहायला मिळेल. सोशल मीडियावर या वेब सिरीजचा निषेध होत आहे.