मुंबई – साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शेट्टी आपल्या आगळ्या वेगळ्या भूमिकांसाठी ओळखली जाते. अनुष्काने आजवर अनेक भूमिका साकारल्या आहेत. ज्यात लव्ह स्टोरीपासून ते व्हिलनपर्यंतच्या भूमिकांचा समावेश आहे. आजही अनुष्काचे शेट्टीचे नाव आले की डोळ्यासमोर येते ती तिची बाहुबली सिनेमातील भारदस्त व्यक्तिरेखा. बाहुबली सिनेमात अनुष्काने ऐतिहासिक भूमिका साकारली होती. परंतु बाहुबलीपूर्वी अनुष्काचा लूक खूप वेगळा होता. सध्या अनुष्काचा एक जुना फोटो जोरदार व्हायरल होतोय.
अनुष्काचा व्हायरल होत असलेला फोटो २०१५ मधील आहे. ज्यात तिचे केस खूपच छोटे असल्याचे दिसून येतात. याशिवाय तिची एकून शरीरयष्टी वेगळी असल्याचे दिसून येते. अनुष्काच्या या जुन्या फोटोबाबत चाहत्यांना प्रचंड कुतूहल वाटत आहे. या लूकवरूनच अनुष्काने बाहुबलीसाठी किती मेहनत घेतली याचा प्रत्येय येतो.
सोशल मीडियावर अनुष्काचा हा जुना लुक चांगलाच व्हायरल होत आहे. त्यासोबतच अनुष्काचे बाहुबली चित्रपटातील फोटोही पाहायला मिळत आहेत. अनुष्का लवकरच महेश पी यांच्या आगामी अंटायटल्ड चित्रपटात दिसणार आहे.