न्यूयॉर्क – चित्रपट पाहणे हा अनेकांसाठी आनंदाचा भाग असतो या आनंदाचा वापर विश्व विक्रमासाठी करण्याचे काम एका तरुणाने केले आहे या तरुणाने स्पायडरमॅन नो वे होम हा नवीन चित्रपट तब्बल 292 वेळा पाहिला असून यासाठी त्याने तब्बल सातशे वीस तास चित्रपटगृहात घालवले आहेत याबद्दल त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे रोमिरो एलनिस असे या तरुणाचे नाव असून त्याने हा विक्रम करण्यासाठी स्पायडरमॅन चित्रपटाच्या तिकीटासाठी तब्बल तीन हजार चारशे डॉलर्स खर्च केले आहेत.
एखादा चित्रपट सर्वाधिक वेळा पाहण्याचा पहिला विक्रमही त्याच्याच नावावर असून यापूर्वी त्याने 2019 मध्ये अव्हेंजर्स हा चित्रपट तब्बल 191 वेळा पाहिला होता पण हा विक्रम जास्त काळ टिकला नाही कां 2021 मध्ये अरनॉल्ड क्लेन नावाच्या एका व्यक्तीने कामेलोट द फर्स्ट इंस्टॉलमेंट हा चित्रपट 204 वेळा पाहिला आणि हा विक्रम मोडला आता रोमिरोने अरनॉल्डचा रेकॉर्ड मोडले असून त्याच्या नावावर नवीन विक्रम नोंदवण्यात आला आहे.
हा विक्रम करण्यासाठी त्याला दररोज पाच वेळा बॅक टू बॅक स्पायडरमॅन बघावा लागला त्यासाठी त्याचे दररोज बारा तास खर्च झाले या कालावधीमध्ये त्याला मोबाईल पाहण्यास केव्हा रेस्टरूममध्ये जाण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला होता तो हा संपूर्ण चित्रपट पहात आहे की नाही हे पाहण्यासाठी एका डोअरकीपरची त्याच्यावर सतत नजर होती त्याशिवाय या 292 वेळा पाहण्यात आलेल्या चित्रपटांची सर्व तिकिटे रोमिला जपून ठेवावी लागली त्यांची तपासणी केल्यावरच रोमेरोच्या नावावर हा नवा विक्रम नोंदवण्यात आला.