गाझीपूर – कुटुंबातील सर्वांनीच आत्महत्या करण्याच्या किंवा कुटुंबियांना ठार मारून नंतर स्वताही आत्महत्या करण्याच्या घटना देशात वाढत आहेत. अनेक वेळा गरीबी, बेरोजगारी किंवा कर्जबाजारीपणातून हे प्रकार घडत आहेत असाच एक प्रकार उत्तरप्रदेशातील गाझीपुर येथे घडला आहे.
जखनिया पोलीस स्टेशन हद्दीतील सादत बाजार परिसरात एका 35 वर्षीय व्यक्तीने पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर इसम हा स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता.
त्याचे नाव शिवदास सोनेकर असे होते त्याने आपली पत्नी रीना (वय 30), मुलगा आरव (वय 5) आणि मुलगी सेजल (3) यांची गळफास लाऊन हत्या केली, सोनेकर याने नंतर खोलीच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली, सकाळी मृतदेह सापडले, या घटनेमागे कौटुंबिक कलहाचे कारण असावे असे काहींचे म्हणणे आहे. तथापि या प्रकारामागचे नेमके कारण तपासले जात आहे.