मुंबई – शिवसेनेचा कार्यकर्ता मनसेच्या नावाने पावती बुक बनवून वर्गणी गोळा करत असल्याचा भांडाफोड मनसेच्या प्रफुल जाधव यांनी केला आहे. दोघांना विरार पूर्व मनवेलपाडा, कारगील नगर परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी पैसे घेत असताना पकडले होते.
चार दिवसांपुर्वी मार्केटमध्ये दोन भामटे मनसेच्या नावाने शिव जयंतीची वर्गणी गोळी करीत असल्याचे मनसेचे पदाधिकारी प्रफुल्ल जाधव यांना समजले. त्यावेळी जाधव यांनी परिसर गाठला. तिथे गेल्यानंतर चौकशी केली असता, दोघेही मनसेचे कार्यकर्ते नसल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या हातात शिवजयंतीचे पावती बुक होते.
तिथे उपस्थित अनेकांनी त्यांची कसून चौकशी केली असता, ते नालासोपारा परिसरातील रहिवासी असल्याचे उघडकीस आले. त्यातील एकाच्या खिशात शिवसेनेचे सभासद नोंदणी कार्ड सापडले. त्यामुळे जाधव यांनी पक्षात कट्टर रहा, कोणत्याही पक्षाला बदनाम करु नका असा सल्ला देवून, दोघांना सोडून दिले. मनसेचे पावती फाडणारे आमचे कार्यकर्ते नसल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.
ते दोघेही भामटे होते. त्यामुळेच ते मनसेच्या नावाने पैसे उकळत होते. मनसेने त्यावेळीचं त्यांना पोलिसांच्या स्वाधिन केले पाहिजे होते. त्यामध्ये ते कोण होते हे स्पष्ट झाले असते. माञ मनसे सेनेची बदनामी करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.