बंगळुरू – भारतातील आघाडीची नागरी विमान वाहतूक कंपनी असलेल्या इंडिगो या कंपनीचे संचालक राकेश गंगवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या कंपनीतील आपले भाग भांडवल पुढील पाच वर्षात कमी करण्याचा संकल्प जाहीर केला आहे. त्यांच्या कुटुंबीयांकडे इंडिगो कंपनीचे 36 टक्के भाग भांडवल आहे तर इंडिगो कंपनीच व्यवस्थापकीय संचालक राहुल भाटिया यांच्याकडे 37 टक्के भाग भांडवल आहे.
गंगवाल आणि भाटीया यांच्यामध्ये कंपनीच्या नियमासंदर्भात 2020 मध्ये मतभेद निर्माण झाले होते. राकेश गंगवाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की माझे इंडिगो कंपनीमध्ये बरेच भागभांडवल आहे. मात्र दीर्घ पल्ल्यामध्ये हे भाग भांडवल विविध क्षेत्रात गुंतवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. गंगवाल यांनी अमेरिकेतील नागरी विमान वाहतूक कंपन्यामध्ये बराच काळ काम केले होते.