मुंबई – देशातील बालकांना सध्या आणि अनियंत्रित व अनौपचारीक पद्धतीने खेळणी उपलब्ध केली जात आहेत. त्यामुळे अनेकदा ही खेळणी धोकादायक व अयोग्य असण्याचा धोका संभवतो. आता खेळण्यांचा दर्जा नियंत्रित करणारी यंत्रणा ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड विकसित करणार आहे.
यासंदर्भात ब्युरोने देशभरात निर्माण होणारी खेळणे किमान दर्जाची कशी असावी यासाठी काय करता येईल त्या संदर्भात उपाय योजना सुरू केल्या आहेत. भारतात सध्या खाद्यतेल आणि इतर ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादनाच्या दर्जा ब्युरोकडून प्रमाणीत केला जातो. अशा प्रकारची यंत्रणा खेळण्याच्या बाबतही विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
भारतामधील खेळण्याचा दर्जा नियंत्रित झाल्यानंतर त्यामुळे देशातील बालकांना त्याचा लाभ होईल. त्याचबरोबर दर्जेदार खेळणी विकसित होऊन खेळण्याची निर्यात वाढण्यास मदत होईल असे ब्युरोला वाटते. अशी यंत्रणा विकसित झाल्यानंतर बालकांचे मानसिक आरोग्य वाढविणारी त्याचबरोबर त्यांचा बुध्यांक वाढविणारी खेळणी विकसित होण्यास मदत होईल. यासंदर्भात खेळणी उत्पादकांच्या संघटना, त्याचबरोबर उद्योजकांच्या संघटनांबरोबर ब्युरो चर्चा करीत आहे.