पुणे – गुगल ऍपवर बॅंकेचा कस्टमर केअर नंबर शोधणे एका महिलेला भलतेच महागात पडले आहे. तीच्या बॅंक खात्यातून 63 हजार रुपयांचे ऑनलाईन ट्रांन्सजॅक्शन झाले. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका 47 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनूसार ती फॅशन स्ट्रीट याठिकाणी एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेली होती. त्यावेळी तीने एटीएम मध्ये 10 हजार रुपये काढण्यासाठी प्रोसिजर केली, परंतु एटीएम मधुन पैसे निघाले नाही म्हणून ती घरी निघुन गेली. त्यानंतर तीला पैसे न निघाले बाबत मॅसेज आला नाही. म्हणुन त्यांनी गुगल ऍप मधुन बॅंकेचे कस्टमर केअरला फोन केला.
कोणीतरी अज्ञात मोबाईलधारकाने तीचा फोन उचलुन एटीएम कार्डची बॅंकेसंदर्भातील सर्व गोपनीय माहिती घेतली. यानंतर फिर्यादी यांना काही समजण्याचे आतच फिर्यादी यांच्या बॅंकेचे खात्यावर असलेल्या रकमेमधुन एकुण 63 हजार 810 रुपयाचे ट्रानक्झेक्शन करून फसवणुक केली आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक साळगावकर करत आहेत.