कोरिओग्राफर गीता कपूरने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे ती एकदम चर्चेत आली आहे. या फोटोमध्ये लाल ड्रेसमधील गीता कपूर खूपच छान दिसते आहे. गीता कपूरने आतापर्यंत लग्न केलेले नाही, हे सगळ्यांनाच माहिती आहे.
View this post on Instagram
पण हा फोटो बघितल्यावर सगळ्यांना तिचे लग्न झाले असल्यासारखे वाटायला लागले आहे. तिच्या लाल रंगाच्या ड्रेसबरोबर आणखी एका गोष्टीची चर्चा होते आहे. ते म्हणजे तिने या फोटोमध्ये भांगात कुंकु भरले असल्याचे दिसते आहे.
View this post on Instagram
विवाहित महिलाच भांगात कुंकु भरत असल्याने गीता कपूरने गुपचूप लग्न केले असल्याची चर्चा व्हायला लागली आहे. गीता कपूरने एखाद्या शूटिंगसाठी हा गेटअप केला असावा, असा अंदाजही काही जणांनी व्यक्त केला आहे.
View this post on Instagram
जर गीता कपूरने गुपचूप लग्न केले असले तर ते नक्की कोणाशी केले असेल, हा देखील एक प्रश्न तिच्या फॅन्सना पडला आहे. कारण तिच्या कोणत्याही अफेअरची कधीही चर्चा झालेली नाही. गीता कपूर रिऍलिटी शो मधील जज किंवा कोरिओग्राफर असते. तिने नेहमीच पारंपरिक वेशभूषा केलेली असते.
View this post on Instagram