Success Story : जगभरातील अनेक उद्योजकांनी खडतर परिस्थितीतून पुढे येत मोठे यश संपादन केले आहे. कोणताही व्यवसाय सुरू करायचे म्हंटले की टीसाठी भांडवल आवश्यक असते. मात्र अनेकांनी आर्थिक परिस्थतीमुळे व्यवसायाला सुरुवात करणे कठीण होऊन जाते. मात्र आज एका अशा उद्योजकाची गोष्ट जाणून घेणार आहोत. ज्यांच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणतेही भांडवल नव्हते, मात्र तरीही त्यांनी करोडो रुपयांची कंपनी उभी केली.
नरेंद्र बन्सल (Narendra Bansal) असे त्यांचे नाव असून ते मोबाईल आणि होम अप्लायन्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी इंटेक्सचे संस्थापक आहेत. त्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात खूप संघर्ष पाहिला आणि सततच्या मेहनतीनंतर त्यांनी फक्त 2,000 रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला, जो आज 6,500 कोटी रुपयांची कंपनी बनला आहे आणि त्यांची कंपनी देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी मोबाइल विक्री कंपनी आहे. इंटेक्स आज देशातील मोबाईल आणि ग्राहकोपयोगी वस्तू विकणारी दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे.
मंदिरात लोकांचे फोटो काढण्याचे करायचे काम
एकेकाळी, नरेंद्र बन्सल दिल्लीतील बिर्ला मंदिरात लोकांचे फोटो काढण्याचे काम करत असे. राजस्थानमधील हनुमानगढ येथे 1963 मध्ये जन्मलेल्या बन्सल यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. याच काळात त्यांचे कुटुंब नेपाळला गेले. काही काळानंतर ते पुन्हा भारतात परतले आणि काम करू लागले. बन्सल यांनी दिल्लीच्या स्वामी श्रद्धानंद महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आणि कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी 1980 मध्ये ऑडिओ-व्हिडिओ कॅसेट विकण्यास सुरुवात केली. अनेक कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी दिल्लीतील चांदनी चौकात कॉर्डलेस फोनचा व्यवसाय सुरू केला.
संगणकाचा वापर झपाट्याने वाढत असताना हे घडले. त्यावेळी बन्सल हे नेहरू प्लेस मार्केटमध्ये कॉम्प्युटर फ्लॉपी विकायचे. 1992 मध्ये त्यांनी भाड्याने जागा घेतली आणि कामाचा विस्तार केला. सप्टेंबर1994 मध्ये, त्यांनी 20,000 रुपयांच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीने इंटरनॅशनल इम्पेक्स नावाची संगणक असेंबलिंग फर्म उघडली.
काम थोडे पुढे गेल्यावर बन्सल यांनी 1996 मध्ये इंटेक्स टेक्नॉलॉजी नावाने कंपनी सुरू केली. पूर्वी तो थेट कोरियन आणि चायनीज वितरकांकडून वस्तू खरेदी करून पुरवठा करत असे. त्यामुळे त्यांची उत्पादने बाजारात झपाट्याने लोकप्रिय होऊ लागली. त्यांचा नफा इतर कंपन्यांच्या तुलनेत झपाट्याने वाढला आणि पहिल्याच वर्षी 30 लाख रुपयांचा नफा कमावला. यानंतर स्पीकर आणि डीव्हीडीची विक्री सुरू झाली.
2005 मध्ये उत्पादन केले सुरू
1997 मध्ये बन्सल यांनी इंटेक्सचे पहिले कार्यालय दिल्लीत उघडले आणि वेबकॅम आणि कीबोर्ड विकण्यास सुरुवात केली. 2005 मध्ये त्यांनी कंपनीचे पहिले उत्पादन युनिट स्थापन केले. यामध्ये त्यांनी भारतीय ग्राहकांनुसार स्वस्त स्मार्टफोन बनवण्यास सुरुवात केली. यानंतर कंपनीने एलईडी टीव्हीचे उत्पादनही सुरू केले.
त्यांचा मुलगा केशव बन्सल याने 2012 मध्ये कंपनीचे ब्रँडिंग सुरू केले, त्यानंतर इंटेक्सने मायक्रोमॅक्सला मागे टाकले आणि देशातील दुसरी सर्वात मोठी मोबाइल उत्पादक कंपनी बनली. सध्या, बन्सल यांची एकूण संपत्ती सुमारे 800 कोटी रुपये आहे, तर त्यांच्या कंपनीचे मूल्यांकन अंदाजे 6,500 कोटी रुपये आहे.