Marathi movies that hit the box office in 2025 : २०२५ हे वर्ष अनेकअर्थांनी मराठी चित्रपटांना नवी संजीवनी देणारे ठरले. या वर्षात अनेक दर्जेदार मराठी चित्रपट बॅाक्स अॅाफिसवर येवून धडकले. या वर्षात ५० हून अधिक मराठी चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाले. यापैकी काही चित्रपटांनी बॅाक्स अॅाफिसवर धुव्वा केला. ते चित्रपट कोणते याविषयी आपण जाणून घेणार आहोत. दशावतार २०२५ मध्ये दशावतार, जारण, गुलगंद आणि आता थांबायचा नाय या चार चित्रपटांनी बॅाक्स अॅाफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटांना चांगले यश मिळाले. प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. या चार पैकी दशावतार हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. चित्रपटाने १६ कोटींहून अधिक कमाई केली आहे. दशावतार चित्रपटाची कथा बाप आणि मुलाच्या नात्याचा होती. पण कोकणात घडणाऱ्या या कथेत कोकणाचं सौंदर्य तेथील स्थानिक प्रश्न ज्या पद्धतीने दाखविण्यात आले होते. त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट खूपच भावला. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाने प्रेक्षक भरावले. जारण जून महिन्यात अभिनेत्री अमृता सुभाष हिची मुख्य भूमिका असलेला जारण नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसवर आठ कोटींच्या आसपास कमाई केली. चित्रपटाची कथा थ्रीलर जॅानरमध्ये दाखविण्यात आली होती. सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटाची कथा काळी जादू (ब्लॅक मॅजिक) यावर भाष्य करणारी होती. चित्रपटाचे दिग्दर्शन हृषिकेश गुप्ते यांंनी केले. चित्रपटगृहातून हा चित्रपट ओटीटी माध्यमावर प्रदर्शित करण्यात आला. तिथेही चित्रपटाला चांगला प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला. गुलकंद गुलकंद चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसवर साडेआठ कोटींहून अधिकची कमाई केली. हा चित्रपट एक यशस्वी मराठी फॅमिली कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे. चित्रपटाची कथा प्रेक्षकांना हसवत कौटुंबिक नातेसंबंधांचा अर्थ उलघडून सांगते. चित्रपटाची कथा सई ताम्हणकर, समीर चौघुले आणि प्रसाद ओक या तीन पात्रांभोवती फिरते. चित्रपटाचे बजेट कमी असूनही केवळ चित्रपटाची कथा ज्या आधारावर तयार करण्यात आली. तो विषय प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यात यशस्वी ठरला आहे. आता थांबायचं नाय! अभिनेता भरत जाधव आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव यांचा आता थांबायचं नाय चित्रपटाने देखील चांगली कमाई बॅाक्स अॅाफिसवर केली. साडेसात कोटींची कमाई चित्रपटाने केली. चित्रपटाचा विषय मुंबईतील बीएमसीमध्ये सफाई कामागारांच्या जीवनावर आधारित होता. यामध्ये शिक्षणाचे महत्व दिग्दर्शकाने अधोरिखित केले होते. ज्या पद्धतीने गोष्ट सांगण्यात आली होती, ती प्रेक्षकांना विचार करण्याला भाग पाडणारी ठरली. हेच या चित्रपटाचे खरे यश आहे. हेही वाचा : Ikkis Premiere: रेखाने अमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टरचे घेतले चुंबन; ‘इक्कीस’च्या प्रीमियरमधील व्हिडीओ व्हायरल