Sachin Pilgaonkar and Madhurani Gokhale : अभिनेता सचिन पिळगांवकर आणि अभिनेत्री मधुराणी गोखले तब्बल 22 वर्षानंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. ‘नवरा माझा नवसाचा’ या गाजलेल्या चित्रपटात अभिनेते सचिन पिळगांवकर आणि अभिनेत्री मधुराणी गोखले एकत्र दिसले होते. आता तब्बल 22 वर्षांनंतर ‘कापूसकोंडा’ या आगामी चित्रपटातून पुन्हा एकदा दोघं एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे, बऱ्याच काळानंतर या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री मधुराणी गोखले चित्रपटात कमबॅक करत आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ‘कापूसकोंडा’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. Sachin Pilgaonkar and Madhurani Gokhale ‘कापूसकोंडा’ चित्रपटाची कथा अत्यंत अनोखी आहे. विशेष म्हणजे चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर प्रेरित आहे. चित्रपटाचा खरा हिरो हा पोस्टरवर दिसत असलेला एक ‘कुत्रा’ असून चित्रपटाचे रंजक कथानक हे एका फॅमिली आणि त्या कुत्र्याच्या भोवती गुंफण्यात आलं आहे. मानवी नातेसंबंध, कुटुंब, भावनांवर आधारित ही हळवी गोष्ट प्रत्येकाला आपलीशी वाटणारी आहे. याकरिता या चित्रपटाला ‘अ फॅमिली डॉग फिल्म’ अशी टॅगलाइन देण्यात आली आहे. जास्वंद एंटरटेन्मेंट्स प्रा. लि. निर्मित ‘कापूसकोंडा’ चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन मोहिते यांचं आहे. Genelia Deshmukh: ‘राजा शिवाजी’ ट्रेलर लाँचमध्ये जिनिलीया देशमुखचा मराठमोळा जलवा; गुलाबी नऊवारीतील लूक व्हायरल ‘माझ्या भावनांसोबत या चित्रपटाचं कथानक मिळतंजुळतं’ सचिन पिळगांवकर यांनी या चित्रपटाबाबत सांगितले की, “इतक्या वर्षांच्या माझ्या कारकिर्दीत असं कथानक मी कधी केलं नाही. माझ्या भावनांसोबत या चित्रपटाचं कथानक मिळतंजुळतं असल्याचं मला जाणवलं. त्याचप्रमाणे या चित्रपटाचा लेखक, दिग्दर्शक सचिन मोहिते हा मला पहिल्या भेटीतच कमालीचा हुशार वाटला आणि त्याच्यावर विश्वास ठेऊन मी या चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला.” तर अभिनेत्री मधुराणी गोखले या चित्रपटाविषयी म्हणाली, “लेखक, दिग्दर्शक सचिन मोहिते सरांनी या चित्रपटाची कथा जेव्हा मला ऐकवली तेव्हाच मी या कथेच्या प्रेमात पडली. इतकी गोड, निरागस अशी ही कथा ऐकताना माझ्या मनाला भिडली. सोबत वेगळी भूमिका करण्याची आणि सचिन पिळगांवकर सरांसोबत काम करण्याची मला संधी 22 वर्षांनी मिळणार होती.” Sachin Pilgaonkar and Madhurani Gokhale दरम्यान, मधुराणी गोखले सध्या मराठी मालिकांमध्ये काम करताना दिसते. अलिकडेच ‘आई कुठे काय करते?’ या तिच्या मालिकेला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. हेही वाचा: Jackfruit Pickle Recipe: उन्हाळ्यात करा खास फणसाचं लोणचं! एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल