अमृता खानविलकरची नवी सुरूवात; चाहत्यांची वाढली उत्सुकता

Amruta Khanvilkar | मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्या सौंदर्यासह अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. चंद्रमुखी या चित्रपटामुळे ती प्रसिध्दीच्या झोतात आली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे आणि नृत्याचे प्रचंड कौतुक करण्यात आले.
यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. यानंतर आता अमृता खानविलकर नवी सुरूवात करणार आहे. लवकरच ती रंगभूमीवर पदार्पण करत आहे. ‘लग्न पंचमी’ या नाटकात ती दिसणार आहे. सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत तिने ही माहिती चाहत्यांना दिली आहे.
अमृता लग्न पंचमी या मराठी नाटकातून रंगभूमीवर डेब्यू करत आहे. या नाटकाचे लेखन मधुगंधा कुलकर्णीने केले आहे तर दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी करतो आहे. हे नाटक लवकरच रंगभूमीवर दाखल होणार आहे.
View this post on Instagram
या नाटकाबद्दल अमृता खानविलकर म्हणाली की, “मला नेहमीच निपुण आणि मधुगंधा यांच्यासारख्या लोकांसोबत काम करण्याची इच्छा होती. मला वाटते की ते प्रोजेक्टना एक वेगळा आणि नवा दृष्टिकोण देतात आणि मला त्यांचे खूप कौतुक वाटते.”
मात्र यात कोणत्या भूमिकेत दिसणार? याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र तिला रंगभूमीवर काम करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
हेही वाचा:
शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स १६० अंकांनी तर निफ्टी २५,९५८ च्या खाली घसरला




