Maharashtra State Marathi Film Awards : ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानंतर आता महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या पुरस्काराचे हीरक महोत्सवी वर्ष असल्याने मुंबईतील वरळी डोम येथील एसव्हीपी स्टेडियम येथे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ५ अॅागस्ट २०२५ या दिवशी पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. या पुरस्कारात दिल्या जाणाऱ्या पुरस्कारार्थींच्या नावे जाहीर करण्यात आली आहे. यंदाच्या संगीत क्षेत्रात आपले अमूल्य योगदानाबद्दल गजलनवाज भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५ देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच कै. व्ही. शांताराम पुरस्कार प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकर यांना देण्यात येणार आहे. विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे हिला देऊन गौरविण्यात येणार आहे. स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना आणि स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल यांना दिला जाणार आहे. या पुरस्कारांचे वितरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. साठच्या दशकात महाराष्ट्रातील मराठी चित्रपट, कलाकार आणि तंत्रज्ञांचा भव्यदिव्य सोहळ्यात यथोचित सन्मान करत वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या हीरक महोत्सवी वर्ष हे खास असणार आहे. महावारसा पुरस्काराची घोषणा यंदाच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार २०२५ या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. सांस्कृतिक वारसा आणि इतिहास जपणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव या पुरस्काराने करण्यात येणार आहे. हेही वाचा : Ajit Pawar : “दादा कोल्हापूरच्या हत्तीणीला परत आणा”; तरुणाची भरसभेत मागणी : अजित दादांनी काढली समजूत म्हणाले…