मित्रांची साथ असेल तर सारं काही शक्य; होमबॅाऊंडच्या ट्रेलरने मन जिंकलं, एकदा बघाच!

Homebound Trailer Out : गेल्या बऱ्याच दिवसांपासून अनेक फिल्म फेस्टीव्हलमध्ये ज्या सिनेमाचं प्रचंड कौतुक करण्यात आलं. आता त्या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. होमबाऊंड या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, ट्रेलर पाहून सिनेमाची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या २६ सप्टेंबर या दिवशी हा सिनेमा देशभरात रिलीज होणार आहे.
या सिनेमात ईशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. धर्मा प्रॉडक्शनने सोशल मीडियावर या सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला. ट्रेलर शेअर करताना, प्रॉडक्शन हाऊसने लिहिले, “आमच्या हृदयाच्या एका तुकड्याला तुमच्या घरात घर मिळो, होमबाउंडचा अधिकृत ट्रेलर सादर करत आहे.
ट्रेलरमध्ये ईशान खट्टर आणि विशाल जेठवा हे बालपणीचे मित्र आहेत जे पोलिस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहतात आणि ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतात, यामध्ये पुढं काय काय होतं ही सिनेमाची कथा आहे. सिनेमात ईशान मोहम्मद शोएबची भूमिका साकारत आहे, तर विशाल चंदन कुमारची भूमिका साकारत आहे. या दोन मित्रांची स्वप्ने आणि संघर्ष कथेला पुढे नेते.
View this post on Instagram
दुसरीकडे, जान्हवी कपूर चंदनचा प्रियकर विशाल म्हणून दिसते. तिची उपस्थिती स्पष्टपणे दर्शवते की ती दोन मित्रांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. “होमबाउंड” सिनेमा येण्यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित झाला आहे, जिथे त्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे. आता निर्मात्यांनी चित्रपटगृहांमध्येही असाच प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे.
हेही वाचा : राज ठाकरेंनी मीनाताईंच्या पुतळ्याजवळील घडलेल्या घटनेची घेतली माहिती; उद्धव ठाकरेही घटनास्थळी दाखल होणार





