अनेक यंत्रमाग बंद पडणार?
मुंबई, दि. 28 – केंद्रीय अंदाजपत्रकात कापडावरील अबकारी करआकारणीची जी पुनर्रचना केली आहे, तिचा विपरीत परिणाम होऊन अनेक यंत्रमाग गिरण्या बंद पडतील, अशी भीती यंत्रमाग उद्योगाकडून व्यक्त करण्यात येत आहे. इतर गिरण्यांपेक्षा यंत्रमाग गिरण्यांना आता अधिक कर भरावा लागेल.
तेलाच्या तीनच कंपनी राहणार
नवी दिल्ली – तेलशुद्धीकरण व वाटप या क्षेत्रात इंडियन ऑइल
कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत रिफायनरीज लि. व हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. या तीनच कंपन्या ठेवण्याचे सरकारने योजिले आहे. आज तेलमंत्री बहुगुणा यांनी ही माहिती दिली.
भारत-पाक यांनी संयुक्त प्रयत्नाने गरिबी हटवावी
जम्मू – भारत व पाकिस्तान हे दोन्ही देश गरीब असल्यामुळे त्यांनी एकत्रितरित्या भारतीय उपखंडातील दारिद्य्र निर्मूलनाचे कार्य केले पाहिजे, असे परराष्ट्रमंत्री अटलबिहारी वाजपेयी म्हणाले.
पुन्हा देशव्यापी आंदोलनाचा इशारा
इस्लामाबाद – गेले चार महिने चालू असलेला राजकीय पेचप्रसंग सोडविण्यासाठी सरकारने आमच्या योजना मान्य केल्या नाहीत, तर शुक्रवारपासून पुन्हा देशव्यापी आंदोलन सुरू करू, असा इशारा पाकिस्तानातील विरोधी आघाडीने दिला.