व्हिएतनामचे विमान चाच्यांनी पळविले
सिंगापूर, दि. 29 – व्हिएतनामचे एक प्रवासी विमान आज थायलंडवरून उड्डाण करीत असताना चाच्यांनी पळविले. त्यानंतर ते सिंगापूरमधील सेलेटर विमानतळावर उतरविण्यात आले, असे पोलीस प्रवक्त्याने सांगितले.
हे विमान डीसी 3 जातीचे असून त्यात 36 प्रवासी होते. 4 इसमांनी ते पळविले. ते सेलेटर विमानतळावर उतरविण्यात आले. या विमानातील 2 व्हिएतनामी अधिकारी ठार झाले, असे रात्री सिंगापूरहून आलेल्या बातमीत म्हटले आहे.
कापूस एकाधिकार खरेदी योजना पुन्हा सुरू होणार
नागपूर – महाराष्ट्र सरकारने कापूस एकाधिकार खरेदी योजना “तात्पुरती’च स्थगित केली आहे. या किंवा पुढील वर्षापासून ती पुन्हा चालू करण्याचे प्रयत्न चालू आहेत,
असे आश्वासन आज विधानसभेत अर्थमंत्री यशवंतराव मोहिते व सहकार मंत्री शिवाजीराव पाटील यांनी दिले. ही कापूस उत्पादकांच्या हिताची होती. ती शासनास रद्द करावीशी वाटत नाही, मात्र केंद्र सरकारने साहाय्य देण्यास नकार दिल्याने ही योजना स्थगित करावी लागली.