पळविलेले ते विमान एडनला उतरले
दुबई, दि. 16 – पश्चिम जर्मनीचे हवाईचाच्यांनी पळविलेले विमान आता 2 तासांपूर्वीच ओमानच्या “सालाह’ विमान तळावरून पुढे गेले असे वृत्त आहे. ही वेळ सायंकाळी 6 वा. 35 मिनिटे (भारतीय वेळ) होती. मस्कतमध्ये हवाईचाच्यांनी विमान उतरू देण्याची परवानगी मागितली नाही.
हे पळविलेले विमान एडनच्या तळावर उतरले आहे. काल त्यांनी 11 टन पेट्रोल व इंधन मागितले होते. पेट्रोलची पूर्तता रोखता येईल का, याबाबत त्वरित निर्णय घेणे गरजेचे आहे. कारण, हवाईचाचे कोणताही घातपात घडवून आणू शकतात.
मलेरियाचे डास आता आणखी “सुदृढ’ झाले
नवी दिल्ली – डीडीटीनंतर मलेरियाचे डास आता “मॅलाथियॉन’ या औषधी द्रव्यासही दाद देईनासे झाले आहेत. राष्ट्रीय मलेरिया निर्मूलन कार्यक्रमाचे डॉ. आर. राजगोपाल यांना ही गोष्ट आढळून आली असून तसा पुरावाही मिळाला आहे.
आपल्या अहवालात डॉ. राजगोपाल म्हणतात, 1900 साली हे जंतू मॅलाथियॉनला 100 टक्के बळी पडत होते. तर 1970 साली फक्त 43 टक्केच जंतू बळी पडले. डेंग्यू तापाचे डास हे आता झाडावर अंडी घालीत असल्याचे पुण्यातील संशोधनात आढळून आले आहे.