वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघातील 3 महिला खेळाडूंचा राज्य सरकारकडून होणार सत्कार; फडणवीसांची घोषणा

Devendra Fadnavis | टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका संघाचा ५२ धावांनी पराभव करत वनडे वर्ल्ड कपवर नावं कोरले. आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ चा ऐतिहासिक किताब जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघावर बक्षिसांची बरसात सुरू झाली आहे.यानंतर आता राज्य सरकारच्या वतीने या महिला खेळाडूंचा सत्कार आणि त्यांना रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना याची घोषणा केली.
महिला भारतीय संघामध्ये महाराष्ट्रातील सांगलीची कन्या स्मृती मंधाना, सेमी फायनलमध्ये शतक ठोकणारी जेमिमा रॉड्रीग्ज आणि स्पिनर राधा यादव यांचा समावेश आहे. तिघींचाही राज्य सरकारकडून सत्कार करण्यात येणार असून रोख पारितोषिकाने गौरव करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. तर जेव्हा मुंबईत सर्व संघ येईल त्यावेळी सर्व खेळाडूंचाही सत्कार करण्यात येईल, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. Devendra Fadnavis |
याआधी टीम इंडियाच्या मेन्स खेळाडूंचा देखील सत्कार
महाराष्ट्राच्या तिन्ही खेळाडूंना किती रोख पारितोषिक दिलं जाईल, याची घोषणा अद्याप करण्यात आली नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यावर टीम इंडियाच्या मेन्स खेळाडूंचा देखील सत्कार राज्य सरकारने केला होता. यामध्ये रोहित शर्मा, शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव यांचा समावेश होता. Devendra Fadnavis |
वर्ल्ड कपमध्ये स्मृती मंधाना ही भारतीय संघाची मुख्य ओपनर होती, ती वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारी दुसरी खेळाडू ठरली आहे. तर जेमिमाहने सेमी फायनल सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध नाबाद शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला आहे.
दरम्यान, यावेळी फडणविसांनी पुणे जिल्ह्यात बिबट्यामुळे होत असलेल्या मृत्यूच्या घटनांवर देखील भाष्य केले. “ही दुर्देवी घटना आहे. पुणे, नगर जिल्ह्यात 1300 बिबट्यांच विचारणा सुरु आहे. केंद्र सरकारशी यावर चर्चा सुरु आहे. या संदर्भात वळसे-पाटील आले होते, त्यांनी हा सुर्व मुद्दा गंभीरतेने मांडला. हे बिबटे पकडून रेस्क्यू सेंटरकडे देण्याची परवानगी द्यावी अशी विनंती करणार आहोत. त्या सोबत स्टरलायझेशन प्रोग्रॅम करण्याची परवानगी मागणार आहोत,” असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. Devendra Fadnavis |
हेही वाचा:





