आयर्लंडविरूद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, स्मृती मंधाना बनली कर्णधार, हरमनप्रीत कौरला विश्रांती

Indian Women Team Squad: आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघाची कमान स्मृती मंधाना यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, तर दीप्ती शर्माला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. या मालिकेसाठी हरमनप्रीत कौर आणि रेणुका सिंग यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्याचवेळी शेफाली वर्माला पुन्हा एकदा निवडकर्त्यांनी दुर्लक्षित केले आहे. 10 जानेवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार असून सर्व सामने राजकोटमध्ये होणार आहेत.
या मालिकेसाठी नियमित कर्णधार हरमनप्रीत कौरला विश्रांती देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूरही आयर्लंडविरुद्ध खेळताना दिसणार नाही.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान हरमनप्रीतलाही दुखापत झाली होती, त्यामुळे ती पुढील दोन सामने खेळू शकली नाही. मात्र, तिने वनडे मालिकेत पुनरागमन केले. कॅरेबियन संघाविरुद्ध खेळलेल्या वनडे मालिकेत रेणुका मालिकावीर ठरली होती. तिने तीन सामन्यांत एकूण 10 विकेट घेतल्या.
🚨 𝙉𝙀𝙒𝙎 🚨#TeamIndia (Senior Women) squad for series against Ireland Women announced.
𝗡𝗢𝗧𝗘𝗦: Harmanpreet Kaur and Renuka Singh Thakur have been rested for the series.
Details 🔽 #INDvIRE | @IDFCFIRSTBank
— BCCI Women (@BCCIWomen) January 6, 2025
शेफालीने पुन्हा केले दुर्लक्ष –
वेस्ट इंडिजपाठोपाठ आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठीही निवड समितीने शेफाली वर्माकडे दुर्लक्ष केले आहे. शेफाली सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि वरिष्ठ महिला एकदिवसीय ट्रॉफीमध्ये ती चांगली कामगिरी करत आहे. 7 सामन्यांमध्ये शेफालीने आतापर्यंत 75.28 च्या सरासरीने आणि 152 च्या स्ट्राईक रेटने 527 धावा केल्या आहेत. मात्र, असे असतानाही निवड समितीने शेफालीवर विश्वास दाखवलेला नाही.
हरियाणाविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात शेफालीने 115 चेंडूत 197 धावांची शानदार खेळी केली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या फलंदाजीने खळबळ माजवणाऱ्या प्रतिका रावलला पुन्हा एकदा संघात संधी देण्यात आली आहे. या मालिकेला 10 जानेवारीपासून सुरुवात होणार असून शेवटचा सामना 15 जानेवारीला होणार आहे.





