Devendra Fadnavis : राजधानीत राजकीय हालचालींना वेग! मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांदरम्यान मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा, चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : दुसरीकडे, दिल्लीतही महत्त्वाच्या राजकीय हालचाली सुरू आहेत. केंद्र सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत हालचालींना वेग आला आहे.

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडामोडींना प्रचंड वेग आला असून, शिवसेना (ठाकरे गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र होताना दिसत आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. त्यातच पक्षातील एका आमदाराची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड झाल्याने ठाकरे गटाला आणखी एक राजकीय धक्का आहे. आगामी काळात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही आमदार शिंदेंच्या शिवसेनेतील जातील, अशीही चर्चा सातत्याने होत आहे.
दुसरीकडे, दिल्लीतही महत्त्वाच्या राजकीय हालचाली सुरू आहेत. केंद्र सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षनितीन नवीन यांची भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत तब्बल ३ तास बैठक पार पडली. या बैठकीत संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Devendra Fadnavis)
आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली असून, त्यांचा दिल्ली दौराही राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. अधिकृत कार्यक्रमासाठी ते राजधानीत असले, तरी संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भेटींकडेही राजकीय वर्तुळाचे बारकाईने लक्ष लागले आहे.
हेही वाचा : Anger Control: रागावर नियंत्रण ठेवायचंय? ’30-30-30′ फॉर्म्युला ठरू शकतो गेमचेंजर; जाणून घ्या 5 सोपे उपाय
शिंदेंच्या शिवसेनेला दोन केंद्रीय मंत्रीपद? (Devendra Fadnavis)
शिंदे गटात नुकतेच दाखल झालेल्या सहा खासदारांपैकी दोघांना केंद्रीय मंत्रिपदाची संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्री मंडळात स्थान दिले जाऊ शकते. माध्यमांत असलेल्या माहितीनुसार त्यांचे केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान पक्के झाल्याचे बोलले जात आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेला केंद्रीय राज्यमंत्री पद मिळू शकते अशी देखील शक्यता वर्तवण्यात आली असून, सहा खासदारापैंकी कोणाच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक (Devendra Fadnavis)
ठाकरे गटाला लागलेली गळती रोखणे हेच मुख्य आव्हान पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर असणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आज (मंगळवारी) सायंकाळी ७ वाजता सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. पक्षातील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील राजकीय रणनीती निश्चित करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे या बैठकीत उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना काय मार्गदर्शन करणार याविषयी विविध चर्चा झडू लागल्या आहेत.





