बार टेल्ड गॉडविट नावाच्या पक्षाने नोंदवला अनोखा विक्रम
होबर्ट – आकाशात उडण्याची शक्ती ही पक्षांसाठी एक देणगी असली तरी प्रत्येक पक्षाची उडण्याची एक विशिष्ट मर्यादा असते मात्र बार टेल्ड गोडबिट नावाच्या पक्षाच्या नावावर एक अनोखा विक्रम जमा झाला असून त्याने अकरा दिवसांमध्ये तब्बल 13560 किलोमीटर अंतर न थांबता उडून पार केले आहे या पक्षाने 13 ऑक्टोबरला अलास्का मधून आपला प्रवास सुरू केला होता,
आणि 25 ऑक्टोबरला त्याने टास्मानियामध्ये हा प्रवास संपवला तेव्हा त्याच्या नावावर 13560 किलोमीटर प्रवास नोंदवण्यात आला होता या पक्षाच्या शरीरावर फाईव्ह जी सॅटॅलाइट टॅग बांधण्यात आल्यामुळे त्याच्या हालचालींची दखल आणि नोंद घेणे शक्य झाले बार टेल्ड गॉडविट या पक्षाने 2020 मध्ये सुद्धा अशाच प्रकारचा विक्रम केला होता तेव्हा या पक्षाने 11 दिवसांमध्ये 12000 किलोमीटर अंतर पार केले होते.
यावेळी मात्र या पक्षाने आपले पूर्वीचेच विक्रम मोडले असून 11 दिवसात तब्बल 13560 अंतर पार केले आहे अकरा दिवसांच्या प्रवासात या पक्षाने काहीही खाल्ले नाही किंवा काहीही प्राशन केले नाही पक्षांच्या मायग्रेशनवर संशोधन करणाऱ्या संशोधक डॉक्टर जेसली मॅकव्हील यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या पक्षाचे शरीर एखाद्या लढाऊ विमानाप्रमाणे असते आकाशात झेप घेतल्यानंतर तो आपल्या शरीराचा आकार छोटा करतो त्यामुळे त्याला दीर्घकाळ उडणे शक्य होते त्याचे पंख लांब आणि टोकदार असतात त्यामुळे हवा कापणे त्याला जास्त सोपे जाते त्या पक्षाचे वजन 230 ते 450 ग्रॅम असते त्याच्या पंखाची लांबी 70 ते 80 सेंटीमीटर पर्यंत असू शकते ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलँड प्रदेशांमध्ये हा पक्षी जास्त आढळतो आणि याच प्रदेशांमध्ये ते सतत स्थलांतर करत असतात.